यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल शिवारात आज सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी मजुर घेवुन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चार मजुर जखमी झाले असुन एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांकड्डन मिळाली आहे . यावल शिवारातील प्रमोद नमाडे यांच्या शेतात आज दिनांक १९ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळ ९ वाजेच्या सुमारास शेतीकामासाठी मजुर घेऊन जाणारे ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी होऊन झालेल्या अपघातात राहुल वासकर बारेला, सागर अशोक मालाचे, पंडू सालदार बारेला व भुरा भैय्या बारेला हे चार मजुर जखमी झाले आहे.
या सर्व जखमींना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता रूग्णालयात डॉ प्रशात जावळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम सोमनाथे यांनी त्यांच्यावर तातडीने प्रथमपचार केले. यातील दोन जणांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असुन त्यात एकाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . दरम्यान घटनेची माहीती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस व नागरीकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जख्मी आपल्या परी योग्य ती मदत केली , या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे यांच्यासह आदीनी रुग्णांना सहकार्य केले.