छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता झाली असून पैठण गेट येथील एका मोबाईलच्या दुकानात ३९ लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माइल, शेख रिझवान शेख शफिक या चौघांना अटक झाली.
शहरातील डिलक्स मार्केटमधील एसएस ॲक्सेसरीज या मोबाईलच्या दुकानात काळ्या रंगाच्या बॅगमधून आरोपी ३९ लाख रुपये घेऊन आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी चार आरोपी ही रोकड आणि नोटा मोजण्याच्या मशीन आढळून आले. यासंदर्भात पोलिसांनी संशय घेऊन चौघांना अटक केली आहे.
छ.संभाजीनगरात मोबाईल दुकानातून ३९ लाख रूपये जप्त; चार आरोपींना अटक
8 months ago
No Comments