यावल तालुक्यात ६७ ग्रा.पं.त प्रत्येकी ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य

743e4417 e462 405e 9f15 cf976996d956

यावल (प्रतिनिधी) निसर्गाचा आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपल्या सगळयांची सामुहीक जबाबदारी आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. देशाच्या व आपल्या राज्याच्या पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पुन्हा राखण्याची जबाबदारी प्रत्येक पर्यावरणप्रेमी नागरिकाची असल्याचे मत सामाजिक वनीकरणच्या वनक्षेत्रपाल प्रज्ञा वडमारे यांनी आज येथे व्यक्त केले.

 

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना यावेळी प्रत्येकी विविध जातींचे ३२०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले असुन एकुण ६७ ग्रामपंचायतींचा यात समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने या वर्षी संपुर्ण राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. यावल सामाजीक वनीकरणाच्या कक्षेत यावर्षी ज्या विविध जातींच्या वृक्षांच्या वृक्षांचा समावेश करण्यात आला आहे, ते पुढील प्रमाणे आहेत. रोपवाटीकेतील लहान रोपांची संख्या बांबु ४१,८००, शिबु ५५,२००, आवळा १९,८००, खैर ६,५००, निंब १०००, फापडा १६००, आणि शिवण २,२००, अशी एकुण एक लाख ४० हजार वृक्षांची रोपे उपलब्ध असल्याचे वडमारे यांनी यावेई सांगीतले. या शिवाय १ ऑगस्ट २०१८ पर्यंतची सुमारे ६० हजार लहान रोपेही शिल्लक आहेत. त्यात गुलमोहर, सुनमोहर, आवळा, निम, सिताफळ, अंजन, जांभुळ, बदाम, काशीद, सिसु, सिसम, रेन्द्री, अशा रोपे वाटीकेत आहेत. सामाजिक वनीकरणच्या या रोपवाटीकेत कार्यरत असलेले वरिष्ठ वनपाल डी.बी. तडवी, रोपवाटीका वनपाल अशोक पाटील, त्याचबरोबर वनमजुर जी.बी. बाविस्कर, एम.एस. सावकारे, एस.एन. पिंजारी यांनी याकामी परिश्रम घेतले आहेत.

Add Comment

Protected Content