जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ गरजू रुग्णांवर मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे खान्देश व विदर्भातील रुग्णांना अक्षरशः नवी दृष्टी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला.
डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत हभप जगन्नाथ महाराज नेत्रालयात नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने ६६ रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांशी संवाद साधताना डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रुग्णांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, अनेक ठिकाणी मोफत शिबिराच्या नावाखाली खर्च करावा लागतो, मात्र येथे एकही रुपया खर्च न करता अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ वातावरण, आपुलकीची सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाले. एवढे मोठे व्यक्तिमत्व असूनही डॉ. उल्हास पाटील आमच्यात मिसळून वाढदिवस साजरा करतात, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसमवेत डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, विभागप्रमुख डॉ. एन. एस. आर्विकर यांच्यासह नेत्रतज्ज्ञ आणि वैद्यकीय टीममधील अनेक डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. निखील चौधरी, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अनिश कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ. नितु पाटील यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ६६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम म्हणजे त्यांच्या वाढदिवसाची खरी भेट असून समाजसेवेच्या त्यांच्या विचारांचा हा एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.



