Home क्राईम अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हरताळा फाटा परिसरातील हनुमान मंदिराजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात २० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, धडक देणारा अज्ञात वाहनचालक घटनेनंतर अपघातस्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजल संजय लुनावत (वय २०, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) हा तरुण २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या होंडा ट्विस्टर दुचाकीने (क्रमांक MH 19 BD 8741) बाणईत शिवारातील आपल्या शेताकडे जात होता. हनुमान मंदिराजवळ पोहोचले असता सुजलला अचानक चक्कर आली. त्याने सावधगिरी म्हणून गाडीचा वेग कमी केला, मात्र त्याच वेळी समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुजल हा गंभीर जखमी झाला असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी अज्ञात वाहनचालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून वेगाने पसार झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ संदीप वानखेडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound