Home Cities पारोळा धोत्रे-आंचळगाव परिसरात बसअभावी गैरसोय; फेऱ्या वाढवण्याची मागणी

धोत्रे-आंचळगाव परिसरात बसअभावी गैरसोय; फेऱ्या वाढवण्याची मागणी


पारोळा , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धोत्रे (ता. भडगाव) परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बस फेऱ्या वाढवण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना धोत्रे शाखेच्या वतीने पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने एसटी महामंडळाच्या विस्कळीत सेवेमुळे होणारी गैरसोय दूर करून नवीन मार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या: एरंडोल आगार: एरंडोल-आडगाव-पिंपरखेड-धोत्रे-आंचळगाव-आमडदे-भडगाव-चाळीसगाव-नांदगाव ही बस सेवा तातडीने सुरू करावी. ही बस सकाळी ११ वाजता आंधळगाव परिसरात पोहोचेल अशा नियोजनाची मागणी करण्यात आली आहे. अमळनेर-पारोळा-आंधळगाव-धोत्रे-गिरड-पाचोरा ही बस सेवा सुरू करावी. विशेषतः शाळेच्या मुलांसाठी ही बस सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आंचळगाव येथे पोहोचणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच, ही बस पाचोरा येथे मुक्कामी असून सकाळी ७ वाजेपर्यंत धोत्रे येथे पोहोचल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल. जामनेर-अळणेर-पाचोरा-गिरड-धोत्रे-आंचळगाव-अमळनेर ही बस सेवा देखील सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. “शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना सध्या बसअभावी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आमदारांनी या विषयात लक्ष घालून एस.टी. महामंडळाकडून या फेऱ्या मंजूर करून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संपर्क प्रमुख भगवान चौधरी महाराष्ट्र शेतकरी संघटना भडगाव तालुकाध्यक्ष अभिमान हाटकर, धोत्रेचे विकास हाटकर, उमेश धनगर, संभाजी कऱ्हे, कैलास धनगर, समाधान हाटकर, सुनील पाटील, भाईदास सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अमोल पाटील यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.


Protected Content

Play sound