महिलांना महिन्याला तीन हजार ते मोफत बस प्रवास; मविआचा जाहीरनामा प्रसिध्द

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. पुढच्या काही दिवसांत राज्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आश्वासनांची खैरात वाटत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचा जाहीनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आलं आहे. जाहीरनामा पुढीलप्रमाणे आहे-

१. महालक्ष्मी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
२. महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
३. ६ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार
४. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
५. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये २ दिवसांची ऐच्छिक रजा देणार
६ .जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, १८ वर्षांनंतर लाख रुपये देणार
७. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
८. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
९. नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत सूट देणार
१०. राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
११. एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणार
१२. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेणार
१३. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी २ हजार देणार
१४. ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे १०० युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
१५. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
१६. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
१७. महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
१८. महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
१९. शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
२०. सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
२१. राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार

Protected Content