महिलांना महिन्याला मिळणार ३ हजार; महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची आता प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत.

सभेच्या सुरुवातीला मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी भाषण केले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करत महायुती सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीची सरकार पुन्हा येणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंडिया आघाडीची पहिली प्रचारसभा मुंबईत पार पडली. त्यावेळी राहुल गांधींनी भाजपावर टीका करत महालक्ष्मी योजनेची घोषणाही निवडणुकीच्या अनुषंगाने केली आहे. या सभेत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे –

१. जातीनिहाय जनगणना – ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार.
२. कुटुंब रक्षण – २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा देणार.
३. महालक्ष्मी योजना – महिलांना महिन्याला ३ हजार रुपये देणार
४. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांना महिन्याला ४ हजार रुपये देणार.
५. शेतकऱ्यांना कर्जमाफी – नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी.

Protected Content