मुंबई प्रतिनिधी । गोवंडी येथे सेप्टिक टॅंक स्वच्छ करत असताना ३ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज गोवंडी येथील रहेजा कॉम्पलेक्सजवळील गणेशवाडी येथे घडली. मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाहीय.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवंडीमधील गणेशवाडी परिसरातील मोरया एस.आर.ए बिल्डींगमधील सेफ्टीक टँक साफ करण्यासाठी हे कामगार आले होते. मात्र हे टँक साफ करत असताना तिन्ही कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. मृत्यू झालेले तिन्ही कर्मचारी हे खाजगी कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली.