नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मोदी मंत्रिमंडळाने पहिल्याच बैठकीत गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत खेडोपाडी आणि शहरांमध्ये बांधलेल्या या घरांमध्ये शौचालय, वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन असेल.
गेल्या 10 वर्षांत या योजनेअंतर्गत एकूण 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मोदी 3.0 ची पहिली कॅबिनेट बैठक सोमवार, 10 जून रोजी पंतप्रधान निवासस्थानी झाली. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते. रविवारी 9 जून रोजी संध्याकाळी मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 71 मंत्र्यांनीही शपथ घेतली, त्यात मित्र पक्षांच्या 11 जणांचा समावेश आहे.