Home Cities जळगाव महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे ‘गांधी सप्ताह’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे ‘गांधी सप्ताह’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे ‘गांधी सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले. हा सप्ताह २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध स्पर्धां घेण्यात आल्या. यात भित्तिपत्रक स्पर्धा, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी गांधी सप्ताहानिमित्त भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १९ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे म्हणाले की, गांधी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गांधी विचारांची जाण वाढविण्यासह राष्ट्रभक्ती, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होत असल्याचे प्र-कुलगुरूंनी सांगितले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत आणि महात्मा गांधी, गांधीजीच्या चष्म्यातून भारत, मोहनदास ते महात्मा आणि इंग्रज विरुद्ध गांधी या विषयांवर आकर्षक भित्तीपत्रके सादर केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गांधी विचारांचे प्रत्यक्ष चित्रण करत स्वच्छता, सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा अधोरेखित केली.

कार्यक्रमाला विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे, विद्यापीठातील प्राध्यापक वृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. कैलास दांडगे, डॉ. प्रीती सोनी आणि डॉ. दिपक खरात तर स्पर्धेचे समन्वयक प्रा. प्रदीप गोफणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेख मोईन यांनी केले तर प्रा. नेहा पाटील, प्रा. मनोज इंगोले आणि प्रा. रोशन मावळे यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound