भाजपतर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत मोतीबिंदू शिबीर


रावेर : तालुक्यात आमदार, खासदार ते स्थानिक संस्थांपर्यंत सर्वत्र भाजपचे वर्चस्व असून, सेवा पंधरवड्यात पक्षाने हाती घेतलेले उपक्रम जनतेत उत्साहाने राबवले जात आहेत. या अंतर्गत रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी “आरोग्याची कोणतीही समस्या असो, नागरिकांनी हक्काने आमच्याकडे यावे,” असे प्रतिपादन भाजप नेते नंदकिशोर महाजन यांनी केले.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने हे शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी तालुकाभरातून मोठ्या संख्येने नागरिक हजर झाले. यावेळी बोलताना नंदकिशोर महाजन यांनी सांगितले की, मागील पंधरवड्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गरीब, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे काम यशस्वीरीत्या केले आहे.

यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या सेवा पंधरवड्यात अनेक गरीब कुटुंबांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या आहेत. गरीबांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच आपल्या कार्याची खरी पावती आहे.”\

या कार्यक्रमाला बाजार समिती संचालक प्रल्हाद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन पाटील, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, ॲड. सुर्यकांत देशमुख, दुर्गेश पाटील, पिपल्स बँक संचालक सोपान पाटील, बाळा आमोदकर, प्रा. सी.एच. पाटील, ॲड. प्रविण पाचपोहे, प्रमोद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून भाजपने आरोग्य व जनकल्याणकारी योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह यानिमित्ताने दुणावला आहे.