जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली होता. रविवारी ९ जून रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहरात पाऊस झाला. पावसाच्या पहिल्याच दिवशी शहरातील बजरंग बोगद्यात पावसाचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
जळगाव महापालिकेने साडे तीन कोटी रुपयांचा खर्च करून रेल्वे प्रशासनाकडून या बजरंग बोगद्याला पर्याय म्हणून दोन समांतर बोगद्यांचे काम करून घेतले. बोगद्यामध्ये नाल्याचे पाणी साचू नये यासाठी गणेश कॉलनीच्या बाजूकडून नाल्याचे पाणी मुक्ताईनगरकडील नाल्याकडे वळविण्याचे नियोजन होते. तसेच हा नाला स्थलांतरित करण्याचाही विचार त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आज रविवारी ९ जूनप रोजी दुपारी ४ वाजता झालेल्या पहिल्याच पावसात बजरंग बोगद्यात तळे साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.