जळगावात २५ लाखांची रोकड जप्त; राजकीय कनेक्शनची चर्चा !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गुरुवारी पोलिसांनी एका व्यक्तीकडून बोहरा गल्ली परिसरातून २५ लाखाची रोकड जप्त केली असून हा व्यक्ती एका नेत्याच्या संस्थेत कामाला असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलीसात तक्रार देण्यात आले आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान एका व्यक्तीकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रमोद हिरामण पवार (वय-५१ रा. तामसवाडी ता. पारोळा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५००, २०० तसेच १०० च्या नोटांची सुमारे २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड तो एका निळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये घेऊन जात होता. जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकांनी त्याला अडवलं बॅगेत काय आहे? अशी विचारणा केल्यावर त्याने मी शेतकरी आहे व माझ्याकडे खूप शेती आहे. आणि मी नोकरीला देखील आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव कमी झाला असल्याने मी सोने घ्यायला आलेलो होतो, असे कारण सांगितले.

परंतु, सदर व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली वाटू लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनीपेठ पोलीस ठाण्यात आणलं प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने एवढी रक्कम कुठून आणली ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता. या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठी रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने या कारवाईची माहिती शनिपेठ पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या असलेल्या भरारी पथकाला दिले. हे रोकड याच पथकाकडे देण्यात येणार असल्याचे रंगनाथ धारबळे यांनी सांगितले.

Protected Content