मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात २४ हजार ६१९ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात २४ हजार ६१९ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत.
आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या १७ लाख ७० हजार ७४८ होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख १ हजार ७५२ केसेस अॅक्टिव्ह आहेत.