मुंबई प्रतिनिधी । राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनी राज्यातील गणितच बदलून टाकले आहे. दरम्यान, यासर्व घडामोडीत राज्याच्या राजकारणात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे यंदाच्या निवडणुकीत एक दोन नव्हे, तर तब्बल दोन डझन म्हणजेच 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा महिला आमदारांची संख्येत चार पटीने वाढ झाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकी 235 महिलांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, यात सत्ताधारी भाजपच्या 12 महिला निवडून आल्या आहेत. तर शिवसेनेच्या 2, काँग्रेसच्या 2, राष्ट्रवादीच्या 3 महिला आमदारा निवडून आल्या आहेत. यातील 24 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना-भाजप युतीला 161 तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 98 जागा मिळाल्या. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं आहे. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.