एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मामा भाचे दुचाकीवरून जळगावहून मराठखेडा येथे घरी परतत असतांना उमरदे खदानीजवळ वळणावर झालेल्या अपघातात २२ वर्षीय भाच्याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि, “आज रविवार, दि.१५ मे २०२२ मामा नगराज भरत पाटील व भाचा पंकज हे जळगाव येथील कामे आटोपून म्हसावद मार्गे दुचाकीवरून घरी परत येत होते. दरम्यान सकाळी १०.५० वाजेच्या सुमारास उमरदे खदानी जवळ वळणावर समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने दुचाकीचा तोल जाऊन ती स्लिप झाली व घसरत जाऊन रस्त्याच्या बाजूला पडली. त्यात दुचाकीवर मागे बसलेला २२ वर्षीय पंकज पाटील वय हा गंभीर जखमी झाला.
त्याला एरंडोल येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारा दरम्यान मॄत्यु झाला. पंकज हा एरंडोल येथे बजाज फायनान्स कंपनीत कामाला होता. त्याला जळगाव येथे खाजगी काम असल्याने (एम एच १९ डीएक्स ४८६७) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावला गेले. ते मराठखेडा येथे घराकडे परत येत असतांना दुचाकीला अपघात झाला. नगराज पाटील हे दुचाकी चालवत होते व पंकज मागे बसला होता.
या घटनेबाबत एरंडोल पो.स्टे. ला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.