डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम .

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तथा माजी खासदार डॉ.उल्हासदादा पाटील   यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण संवर्धन अशा विविध उपक्रमांद्वारे डॉ.उल्हासदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल व गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे सकाळी ८ वाजता होमपूजा व केक कटिंगचे आयोजन केले आहे. यानंतर सकाळी ९ वा. डॉ.उल्हास पाटील यांच्या उपस्थीतीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

 

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोदावरी नर्सिंग, होमिओपॅथी, फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांसह अभिष्टचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले. डॉ.उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील गट क्रमांक ९२ व गट क्र.२७८ या ठिकाणी दुपारी २.३० वाजता वृक्षारोपणाचे आयोजन केले गेले आहे. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शस्त्रक्रिया महाअभियान

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.२३ फेब्रुवारीपासून सात दिवस शस्त्रक्रिया महाअभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांद्वारे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. अद्यावत शस्त्रक्रिया गृह, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, रेडिओलॉजी सुविधा सर्वच एकाच छताखाली असल्याने रुग्णांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२३६६७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Protected Content