चाळीसगाव प्रतिनिधी । मुंबई जाण्यासाठी वडीलाने पैसे न दिल्याने येथील २१ वर्षीय मुलगा हरवल्याची घटना १५ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आल्याने शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वडील प्रतापराव पाटील (वय ५३- संगीत नगर, चाळीसगाव) पत्नी वंदना पाटील, मुलगा शुभंकर पाटील संगीत नगर येथे एकत्रित वास्तव्यास असतात. मुलगा शुभंकर पाटील यांनी मला मुंबई जायचे आहे. आपल्या वडिलांकडून ५ हजार रूपये मागीतले. परंतु वडिलाने नकार दिला. तो काही एक न बोलता रात्री ९ वाजता घरातून बाहेर निघून गेला. परंतु अध्यापपर्यंत घरी न परतल्याने वडिलाने शोधाशोध केली. परंतु सापडून आला नाही. याबाबत वडिल प्रतापराव पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुभंकर पाटील याचा रंग निमगोरा असून उंची ५.८ फूट आहे. पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करत आहे.