मालवाहु गाडीतून २१ लाखांचा गुटखा जप्त; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । मालवाहु चारचाकीतून गुटख्याची तस्करी करणाऱ्या तीघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून २१ लाख २२ हजार ७२० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

गोविंदा विश्वनाथ बाविस्कर (वय २१), गोविंदा पांडुरंग आखरे (वय २१ व गजानन पांडुरंग दहीकर (रा. टुणकी, ता. संग्रामपुर, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या तीघांची नावे आहेत. हे तीघे इच्छापुरकडून अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अशरफ शेख, सुनील दामोदरे, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, दीपक पाटील, दीपक शिंदे, दीपक चौधरी यांच्या पथकाने अंतुर्ली फाट्यावर सापळा रचला. दुपारच्या वेळी संबधित चारचाकी मिळुन येताच अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी चारचाकीतून मोठ्या प्रमाणात गुटखा मिळुन आला. या प्ररकणी चारचाकीचालकास तीघांवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Protected Content