Home क्राईम भुसावळात बंद घर फोडून २० हजाराचा ऐवज लांबविला

भुसावळात बंद घर फोडून २० हजाराचा ऐवज लांबविला

0
61
gharfodi
gharfodi


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोकुळ नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि चांदीचे शिक्के असा एकूण २० हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील गोकुळ नगरात दिनेश भोजलाल लोहार यांची बहीण वास्तव्याला आहे. दरम्यान काही कामानिमित्त त्यांची बहीण घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत आज्ञात चोरट्यांनी १ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री फोडून घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि चांदीचे शिक्के असे एकूण २० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीला आला. या संदर्भात दिनेश लोहार यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.


Protected Content

Play sound