चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगर परिसरात राहणारा भाजीपाला विक्री करणाऱ्या एका तरुणाचे घरातून २० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी रविवारी २ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रल्हाद शंकर पवार वय-४० रा. सुवर्णाताई नगर जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून भाजीपाला विक्री करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. शनिवार १ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने उघड्या घरातून २० हजार रुपयांची रोकड घरातून चोरून नेल्याची घटन उघडकीला आले आहे. याप्रकरणी प्रल्हाद पवार यांनी चाळीसगाव शहर पोलिसात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील हे करीत आहे.