भुसावळ प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी तरूणीशी जबरदस्ती गळ्यात मंगळसुत्र टाकण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी २० वर्षीय तरूणी शहरातील संत गाडगेबाबा हायस्कुलच्या लग्न समारंभात आपल्या कुटुंबियांसह ३ मार्च रोजी रोजी आली होती. त्या लग्नात पंकज दिलीप पांडव रा. पीओएच कॉलनी भुसावळ हा देखील आला होता. लग्न समारंभात असतांना तरूणीच्या कपाळावर सिंदूर व गळ्यात मंगळसुत्र टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला तरूणीने विरोध केला असता पंकज पांडव याने मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विनोद गोसावी करीत आहे.