धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे. अशी माहिती धरणगाव निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
जळगाव ग्रामीण विधान सभेच्या निवडणूकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. यासाठी निवडणूक कार्यालयात इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज विकत घेण्यास सुरूवात केली आहे. यात पहिल्यांच दिवशी पहिला अर्ज ठाकरे गटातर्फे गुलाबराव पाटील -१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर-२, विशाल देवकर-२, अपक्ष प्रसाद लिलाधर तायडे-१, शिवाजी पथरू हटकर-१, राहूल लालसिंग राजपूत-१, उन्मेश राजेश वाडेकर-१, साधना निलेश पाटील-१, सोनी संतोष नेटके-१, अनिल मोहन पवार-१, जितेंद्र पांडूरंग पाटील-१, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे-१, ठाकरे गटातर्फे निलेश सुरेश चौधरी-१, ठाकरे गटातर्फे भागवत धनसिंग धनगर-२, भरत देवचंद पाटील-२, भिका परबत राजपूत -१ यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.