मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, शेतकऱ्यांचे कैवारी शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणी खडसे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पवार साहेबांचे अभिष्टचिंतन केले. येथील जे ई स्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेत विद्यालयातील तब्बल दोन हजार मुला मुलींनी सहभाग नोंदवला.
12 डिसेंबर रोजी रा. कॉ. पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस राज्यभरात साजरा होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणीताईच्या संकल्पनेतूनजे ई स्कूलमध्ये तीन गटात सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी तिन्ही गटासाठी मुला -मुलींनी उत्स्फूर्त सहभाग लाभला. इ.5 वी ते 7 वी च्या प्रथम गटात 600 विद्यार्थ्यांनी तर इ 8 वी ते 10वी दुसरा गट आणि जुनिअर कॉलेजचा तिसरा गट या दोन्ही गटात प्रत्येकी 700 अशा एकूण दोन हजार विदयार्थ्यांनी सामान्यज्ञान स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या बुद्धिमत्तेला कस लावला.
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी रोहिणीताईनी उपस्थिती राहून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या की स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी निरंतर वाचनाची सवय मुला मुलींनी लावून घेतली पाहिजे. ” वाचाल तर वाचाल ” या उक्तीप्रमाणे शालेय पाठयपुस्तका व्यतिरिक्त ग्रंथालयात जाऊन अधिकाधिक पुस्तकं घेऊन अवांतर वाचन करण्याचा सल्ला दिला.नियमित अभ्यासासह अवांतर वाचन ही काळाची गरज आहे.मोबाईल, टी व्ही पासून लांब राहून मैदानी खेळाकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन करुन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक आर पी पाटील, पर्यवेक्षक एस आर महाजन, व्ही डी बऱ्हाटे जेष्ठ शिक्षक जे जे पाटील, एस पी राठोड, व्ही बी राणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर ठाकूर यांनी केले. स्पर्धा परीक्षा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.