अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पाऊले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘एक रोप आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत ६ जुलै रोजी ११ वाजून ११ मिनिटांनी अंबर्षी टेकडीवर दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमळनेरचे सूपुत्र नागपुरचे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उप वन संरक्षक ए.प्रवीण यांची प्रमूख उपस्थिती होती. प्रसाद यांनी अंबरीष ऋषी टेकडीला संरक्षीत वन क्षेत्र जाहीर व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
अंबर्षी टेकडी ग्रुपसह मंगळग्रह सेवा संस्था, महसुल विभाग, वनविभाग,संत सखाराम महाराज संस्थान, महिला हाऊसिंग ट्रस्ट, महाराष्ट्र मंडळ अबु धाबी-दुबई, रोटरी क्लब, लायन्स क्लब, अमळनेर महिला मंच ट्रस्ट, फोटोग्राफर संघटना, पत्रकार संघटना, मारवड विकास मंच, ओम शांती परिवार, पतंजली योग समिती आदी सामाजिक संस्थांतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपील पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्रेहा पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हारचे मुख्य अभिंयंता विजय भदाणे, कंमांडट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रांताधिकारी महादेव खेडकर, मुख्याधिकारी तुषार नेरकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवृत्त प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी, बजरंगलाल अग्रवाल, डॉ. विक्रांत पाटील,डॉ. अपर्णा मुठे,मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सह सचिव दिलीप बहीरम ,खजिनदार गिरीश कुलकर्णी, प्रकाश मेखा, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, बजरंग अग्रवाल, डी.ए. धनगर, उद्योजक विनोद पाटील,धनदाई कॉलेजचे प्रा.के. डी. पाटील, महेश कोठावदे,जळगाव जनता सहकारी बॅँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, महेश कोठावदे, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, प्रसाद शर्मा, वसुंधरा लांडगे, माधूरी पाटील,करुणा सोनार,अपेक्षा पवार ,पराग पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जनता बँक व सौरभ अॅक्वा यांनी पाण्याचे जार दिले तर काही दातांनी गोळ्या बिस्कीट गुप्त दान केले. संजय बाविस्कर यांच्याकडून सर्वांना केळी वाटप करण्यात आले. पालिकेच्या सफाई कामगारांनी जागेची साफसफाई केली. सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले यांनी केले. आशिष चौधरी यांनी आभार मानले.