विद्यापीठाच्या एम.एस्सी रसायनशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुवर्ण पदकासाठी २ लाखाचा धनादेश सुपूर्द

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.एस्सी. रसायनशास्त्र या विषयात प्रथम येणाऱ्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती या संवर्गाच्या विद्यार्थ्यांना “कालकथित हिरामण त्र्यंबक मोरे सुर्वण पदक“ प्रदान करण्यासाठी प्रा.धनंजय हिरामण मोरे यांनी 2 लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला. 

प्रा. धनंजय हिरामण मोरे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रासायनिक प्रशाळेचे  संचालक म्हणून कार्यरत  आहेत. त्यांनी आपल्या वडीलांच्या नावे हे सुवर्णपदक जाहिर केले आहे.  त्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश त्यांनी कुलगुरुंकडे सुर्पूर्द केला. यावेळी यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहुलीकर, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील हे उपस्थित होते.

 

Protected Content