रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात तीन गौण खनिज खदानीतून महसूल प्रशासनाची रॉयल्टी न काढता ३२ हजार ब्रास गौण खनिज वाहतूक केल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाने सुमारे २ कोटी रुपये दंड आकारुन तिघे खदान मालकांला नोटीस बजावली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महसूल विभागा कडून मिळालेल्या माहीती नुसार, रावेर तालुक्यात ईटीएस मशनरीद्वारे गौण खनिज खदानिंची तपासणी झाली होती. यामध्ये महसूल प्रशासनाची रॉयल्टी न काढता वाहतूक झाल्याची तफावत ईटीएसच्या टिमला आढळुन आले. यामध्ये रावेर शहरानजिकची एक मुरुम खदान तर दोन क्रशर खदानींना तब्बल १ कोटी ९४ लाख ९६ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. या तिघे खदानीतून ३२ हजार ४९५ ब्रास गौण खनिज रॉयल्टी न काढता वाहतूक केल्याची तफावत आढळली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात तिघे खदान मालकांना नोटिसा देण्यात आले आहे.भाटखेडा रस्त्याने देखिल एका मुरुम खदानीत गरजे पेक्षा अधिक गौण खनिज वाहतूक करण्यात आले असून खदानी मध्ये मोठ मोठे खोल खड्डे पडले आहे. हजारो ब्रास गौण खनिज रॉयल्टी न काढता वाहतूक करण्यात आली आहे.या खदानीची देखिल चौकशी करण्याची मागणी होत आहे.