Home आरोग्य हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला बीएसएस बोर्डाकडून प्रथम क्रमांकाचे नामांकन

हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला बीएसएस बोर्डाकडून प्रथम क्रमांकाचे नामांकन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन १५ विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली आहे. याशिवाय, भारत सेवक समाज (BSS) बोर्डाकडून संस्थेला प्रथम क्रमांकाचे नामांकन देऊन गेल्या वर्षी पुरस्कृत करण्यात आले आहे. हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट गेल्या ८ वर्षांपासून पॅरामेडिकल क्षेत्रात विविध टेक्निशियन आणि असिस्टंट कोर्सेस चालवत आहे. या संस्थेमार्फत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून दिला गेला आहे.

हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट २०१६ पासून कार्यरत आहे. येथे १०वी, १२वी आणि ग्रॅज्युएशननंतरच्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल क्षेत्रातील टेक्निशियन आणि असिस्टंट कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट आणि नोकरी मिळवून दिली जाते. संस्थेच्या माध्यमातून गरजू महिला आणि युवक-युवतींना प्रशिक्षित करून स्वावलंबी बनवण्याचे कार्य सुरू आहे. जळगावमधील बहुतांश डॉक्टर आणि हॉस्पिटल्सशी संस्थेचे जवळचे नाते आहे. जळगावमध्ये जवळपास ५० टक्के हॉस्पिटल्स आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये MLT, DMLT, X-ray, CT Scan, डायलिसिस टेक्निशियन, MRI, ICU, OT टेक्निशियन यांसारख्या पदांसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. या आवश्यकतेचा विचार करून संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवते.

याचबरोबर, भारत सरकारमान्यताप्राप्त सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) कोर्स हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या २ वर्षांपासून सुरू आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्र शासनाने या कोर्सला मान्यता दिली असून, शासकीय विविध विभागांमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर पदांवर संस्थेचे १५ विद्यार्थी नियुक्त झाले आहेत. ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.

हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटला भारत सेवक समाज (BSS) बोर्डाकडून प्रथम क्रमांकाचे नामांकन देऊन गेल्या वर्षी पुरस्कृत करण्यात आले आहे. हॉस्पिटल क्षेत्राबरोबरच कंपनी क्षेत्रातही संस्था अग्रेसर कार्य करत आहे. जळगावमधील नामांकित रेमंड लिग्रंड कंपनीचे फर्स्ट एड सेंटर चालवण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाते. अचानक होणाऱ्या अपघातांवर मात करण्यासाठी फर्स्ट एड कोर्सच्या माध्यमातून संस्था कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते.

संस्थेच्या संचालिका भारती काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मेडिकल क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेला भेट देऊन त्यांच्या भविष्याचा मार्ग निश्चित करावा. भविष्यातही हॉस्पिटल क्षेत्रातील उत्कृष्ट टेक्निशियन आणि असिस्टंट तयार करण्याचे कार्य संस्था अविरतपणे सुरू ठेवणार आहे.”


Protected Content

Play sound