Home Cities जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने महागाईच्या भस्मासुराचे दहन (व्हिडिओ)

तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने महागाईच्या भस्मासुराचे दहन (व्हिडिओ)

0
82

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन ते शास्त्री टॉवर चौकापर्यंत शुक्रवार दि. १ एप्रिल रोजी महागाईच्या भस्मासुराची प्रेतयात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान,  शास्त्री टॉवर चौकात भस्मासुराचे प्रेत जाळून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

 

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चौधरी  यांनी यावेळी सांगितले की, भारतात प्रत्येक दिवसाआड पेट्रोल व डिझेल सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे शेतकरी, महिला वर्गाचे जीवन जगणे खूप कठीण झाले आहे. त्यातच घरगुती गॅससह व्यवसायिक गॅसचे दर देखील जास्त प्रमाणावर वाढ झाली आहे. जणू काही केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेला मारण्याची सुपारी घेतली आहे. म्हणून महागाई विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी आणि गेंड्याच्या कातडीचे केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या भस्मासुराचा प्रेतयात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वात शास्त्री टॉवर चौकापर्यंत महागाईचा भस्मासुराची प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी तालुका संघटक सचिव भाऊसाहेब सोनवणे, उपाध्यक्ष रवि सोनवणे, महिला तालुका अध्यक्ष आशा माळी, नशिराबाद शहराध्यक्ष अजिज भाई, संजय पाटील, महेश माळी, सुभाष पाटील, मुरली सपकाळे, विनोद चव्हाण, प्रवीण धाडी, प्रशांत धाडी यांच्यासह आदी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/683526746223224

 


Protected Content

Play sound