मुक्ताईनगर तालुक्यातील विकास कामांसाठी १७ कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पावसाळी अधिवेशनात १७ कोटी रूपयांच्या कामाला मंजूरी देण्यात आली असून या कामांना लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात मतदार संघात विकास कामांना सुरूवात केली आहे. केळी उत्पादनाचा पट्टा असलेल्या भागात गेल्या अनेक वर्षांपासून अडचणी होत्या. त्यानुसार आ. पाटील यांनी स्वत: लक्ष घालून शेती रस्ते करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या आहे. शिवाय त्यांनी आता पावसाळी अधिवेशनात विकास कामांसाठी भरीव निधीची मागणी केली होती. त्यानुसार अधिवेशाच्या पुरवणी अर्थसंकल्पात विविध कामांसाठी शासनाकडून १७ कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरचा या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.

मुक्त्ताई नगर तालुक्यात ही कामे होणार –
थोरगव्हाण, गाते, मस्कावद, दसनूर, खिर्डी, ऐनपुर ते रामा क्र. 4 ला मिळणारा मार्ग रस्ता प्रजिमा -14 कि.मी.पर्यंत काँक्रीट गटारीचे व रस्ता बांधकाम करणे. तांदलवाडी, गाते, उदळी, रणगाव, रायपुर मार्ग प्रजिमा-74 कि.मी.च्या रस्त्याची सुधारणा करणे सुधारणा करणे. बलवाडी, पुरी, भामलवाडी, खिर्डी रस्ता प्रजिमा-88की.मी.0/600 ते 2/800 मध्ये संरक्षण भीतीचे बांधकाम करणे.

निंबोल येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे. प्रमुख जिल्हा मार्ग-16 ते चांगदेव मंदिर ते मेहून मुक्ताई मंदिर तसेच चिंचोल, वढवे, नवी कोथळी, सालबर्डी, पिंपरी अकराउत, सातोड, निमखेडी ते राष्ट्रीय महामार्ग 753 एल सारोळा, मन्यारखेडा ते प्रमुख जिल्हा मार्ग -25 रस्ता प्रजिमा -93 कि.मी.चा रस्ता रुंदीकरणासह काँक्रीट रस्ता, काँक्रीट गटार बांधकाम करणे.

चांगदेव मंदिर, मानेगाव, जुनी कोथळी, गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर ते राज्यमार्ग क्र.6 रस्ता प्रजिमा 91 कि.मी.चा रस्ता कॉंक्रिटीकरण गटार व रुंदीकरणासह सुधारणा करणे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा, अंतुर्ली येथे २ मंडळ अधिकारी कार्यालय बांधकाम करणे. तसेच घोडसगाव, चांगदेव, हरताळा, बेलसवाडी, कर्की या ठिकाणी 5 तलाठी कार्यालय बांधकाम करणे. बोदवड येथे १ मंडळाधिकारी कार्यालय व तालुक्यात ४ तलाठी कार्यालय बांधकाम करणे तसेच बोदवड तहसीलदार निवासस्थानाचे बांधकाम करणे व पळासखेडा येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळा इमारतीचे बांधकाम करणे.

Protected Content