पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेमार्फत दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षते नगरपरिषदेसाठी लोकनिर्वाचित नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत भिकनराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभात नगरपरिषदेच्या मोफत वाचनालयात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून त्यांच्या कार्याची आठवण जागृत केली. यावेळी व्यासपीठावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, दादासो अमोल गोविंद शिरोळे, भाऊसो दिपक अनुष्ठान, भूषण टिपरे, विनोद पाटील, इमरान शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वनिधी योजनेतर्गत क्रेडीट कार्ड वितरण, भारतभरातील १ लाख लाभार्थ्यांना कर्ज वाटप तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी श्रम योगी मानधन योजनेची माहिती सविस्तर दिली गेली. यावेळी स्थापत्य अभियंता सुमित पाटील, कर निरीक्षक संजय गिते, पाणीपुरवठा अभियंता संकेत कार्ले, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी, आस्थापना विभाग प्रमुख अनिल तिदमे, सभा अधिक्षक किशोर चौधरी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सुरेश अलोने, विशाल गायकवाड, जितेंद्र चौधरी, रमेश तिळकर, विश्वास पाटील, गणेश माळी, आस्थापना लिपिक ज्ञानेश्वर रिजल, समुदाय संघटक कैलास पावसे, राहुल प्रजापती, श्रीमती मनिषा कदम, श्रीमती वैशाली चौधरी, श्रीमती देविका बोरसे व श्रीमती भारती सोनार उपस्थित होते.
कार्यक्रमात नागरिकांना अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केले. याशिवाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले. या सत्रामुळे नगरपरिषदेच्या विविध योजनांबाबत जनजागृती झाली व नागरिकांमध्ये मतदान व योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळाले.



