भुसावळ,प्रतिनिधी | समाजचे काही देणं लागतो ह्या भावनेतून भाऊबीज निमित्त साधून आपल्या परिवारापासून दूर असलेल्या सैन्यदलातील जवान बांधवांसोबत भुसावळ येथे भाऊबीज साजरी करण्यात आली.
सैनिकांसाठी भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्था ,दुर्गाशक्ती सखी मंच, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, आई बाबा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वज्ञ बहुद्देशीय संस्था अध्यक्षा सुचित्रा महाजन यांनी जवानांना भाऊबीजेचे महत्व समजून सांगितले. तसेच तुम्ही जरी परीवारापासुन दुर असले तरी आम्ही तुमच्या बहिणी आहोत. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहेत. याबद्दल जवानांचे आभार मानले. यावेळी सुचित्रा महाजन, दुर्गाशक्ती सखी मंच उपाध्यक्ष अरुणा परकाळे , आई-बाबा फाउंडेशन सचिव जयश्री ठाकूर , मनीषा ठाकूर यांनी जवानांचे औक्षण केले. प्रास्ताविक आणि संकल्पना याबाबत आई-बाबा फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी माहिती दिली. आभार मी मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राहुल परकाळे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान अध्यक्ष दिपक दाभाडे , आई-बाबा फाउंडेशन अध्यक्ष शैलेंद्र ठाकूर, सर्वज्ञ फाउंडेशनचे रोहन महाजन आदींनी कामकाज पहिले. यावेळी सर्व जवानांनी सर्वांचे आभार मानले व मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज आपण आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि आपल्यासोबत भाऊबीज साजरी केल्यामुळे आम्ही आमच्या परिवारा तच आहोत असे वाटत आहे.