मोठी बातमी : उघड्या घरातून १५ तोळे सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गजानन कॉलनीत एका वकिलाचे उघड्या घरातून शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेचा सुमारास अज्ञात चोरट्याने लक्ष्मीपूजना समोर ठेवलेले १५ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गजानन कॉलनीमध्ये ॲड. प्रताप भिमराव निकम हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दीपावलीच्या लक्ष्मीपूजनच्या निमित्याने त्यांच्या घरात सोन्याचे दागिने घरात लक्ष्मीपूजन करण्यात आले होते. दरम्यान हे रात्रभर हे १५ तोळे सोन्याचे दागिने देव्हाऱ्यात ठेवण्यात आल्यानंतर शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या वाजता प्रताप निकम हे घरासमोरील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरात अज्ञात चोरटा घरात घुसला. चोरटा हा घरात घुसल्याचे प्रताप निकम यांच्या लक्षात आले. तोपर्यंत चोरट्याने घरातील लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले. प्रताप निकम हे तातडीने घराकडे निघाले. त्यावेळी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता निकम यांच्या हाताला झटका देत चोरटा घराच्या कंपाऊंडमधून उडी घेत पसारा झाला. यानंतर प्रताप निकम यांनी याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

Protected Content