चोरी झालेल्या १५ मेंढ्या भोकरबारी शिवारात आढळल्या

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कंकराज येथे धनगर बांधवाच्या १५ मेंढ्या चोरीला गेल्या होत्या. या बकऱ्या अखेर भोकरबारी शिवारातील शेतात आढळून आले. पोलीसांच्या मदतीने मुळ मालकाला त्यांच्या मेंढ्या स्वाधिन करण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील मेहेर व लखमापुर येथील काही धनगर ठेलारी बांधव त्यांचा उदर्निवाह करण्यासाठी आपले गाव सोडुन दसर्या गावी जात असता तर मैहर व लखमापुर येथील ठेलारी पारोळा तालुक्यातील कंकराज येथे त्याचे कुटुंब आलेले होते. त्यावेळी काही पारोळा तालुक्यातील गावकऱ्यांनी त्यांच्या मालकीच्या १५ मेंढया चोरीस गेल्या होत्या. मेंढपालांनी शोध लावुन पण सापडली नाही. त्यामुळे ठेलारी बाधंव यानी पारोळा येथील धनगर समाज युवा मल्हार सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष गौरक्षक समाधान धनगर याची भेंट घेतली. समाधान धनगर यांनी पारोळा शहरात व परिसरात शोध घेतला असता मिळून आल्या नाहीत. म्हणून समाधान धनगर व त्याचा सहकाऱ्यांनी ठेलारी समाज बांधव याना घेवुन पारोळा पोलिस स्टेशन गाठले पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सर्व हकीकत कळवली.

त्यानुसार धनगर समाज युवा मल्हार सेनेचे कार्यकर्ता काही गावात शोध घेत असता गावातील गौरक्षक समाधान धनगर याना फोन करून सांगितले की, आमचा शेतात भोकरबरी शिवारात. १५ मेढ्या आढळुन आले आहेत. लगेच संबंधितानी लगेच समाज बांधव याना घेत धाव घेतली तर मेंढ्याचा शोध लावुन मेढी मालकाचा हवाले केले. त्यावेळी बजरंग दलाचे गौरक्षक समाधान धनगर, राजु गढरी, अनिल पाटील, अमोल पाटील, भैय्या शिंदे, विनय धनगर यांनी परिश्रम घेतले

Protected Content