ब्रेकींग : ॲक्सीस बँक सीटीएम मशीनमध्ये आढळल्या १५ नकली नोटा; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील ॲक्सीस बँकेच्या बाजूला पैसे भरणा करण्याच्या सीटीएम मशीनमध्ये बँकेचा खातेदार किंवा इतर व्यक्तीने १०० रूपयांच्या १५ नकली नोंटाचा भरणा करून बँकेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आले. याची चौकशी केल्यानंतर अखेर गुरूवारी ११ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपल जवळ ॲक्सीस बँक असून बँकेच्या बाजूला पैसे भरणा करण्याचे सीटीएम मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये कुणी नकली नोटांचा भरणा केल्याचा त्या मशिनमध्ये स्वतंत्र्य ट्रे मध्ये जमा करण्याची सुविधा आहे. दरम्यान, ८ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ॲक्सीस बँक अकाऊंट धारक निलेश महेंद्र केदारे यांच्या खात्यात १०० रूपयांचा १५ नोटाचा भरणा केला होता. दरम्यान, ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता बॅकेचे शाखा प्रबंधक कैलास कुदर यांच्या समोर कर्मचारी विनोद सोनवणे आणि गजानन जाधव यांनी सीटीएम मशीन उघडले. यात एका ट्रेमध्ये १०० च्या १५ नोटा बनावट (नकली) आढळून आले. या नोटा बँकेचे अकाऊंट धारक निलेश केदारे यांच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्नात आले. दरम्यान याप्रकरणी उपशाख प्रबंधक कैलास कुदर यांनी गुरूवारी ११ जुलै रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधिर साळवे हे करीत आहे.

Protected Content