पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील रस्ते दुरुस्ती व मजबुती करणासाठी ना. चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प निधीतून १४ कोटी ६६ लक्ष रुपये मंजूर केलेले असून त्यासाठी आ. किशोर पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.
आ. किशोर पाटील यांनी प्रस्ताव दाखल करून वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
१४ कोटी ६६ लक्ष निधीतून होणारी कामे अशी आहेत :-
१) कोठरे दिगर सटाणा मालेगाव पाचोरा पहूर रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण (भाग मानमोडी ते आंबेवडगाव ) एक कोटी रुपये,
२) नगरदेवळा-तारखेडा-शिंदाड- पिंपळगाव रस्ता दुरुस्ती व मजबुती (भाग चुंचाळे ते गाळण व गाळण रेल्वे स्टेशन जवळील, खडकडेवडा ते डोंगरगाव दरम्यान ) दोन कोटी,
३) आसनखेडा -नांद्रा-माहिजी-रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण (आसनखेडा गावाजवळील लांबी) ८४ लक्ष,
४) अंतुर्ली-बाळद (बाळद बु ते बाळद खु. तितूर नदीवरील पूल) दोन कोटी,
५) पळासखेडा-महिंदळे-वलवाडी-आमदडे-वरखेडी रस्ता दुरुस्ती व मजबुती (पळासखेडा ते महिंदळे) दोन कोटी ८२ लाख,
याप्रमाणे अर्थ संकल्पीय निधीतून १४ कोटी ६६ लक्ष एवढा निधी मंजूर झालेला आहे. मतदार संघातील रस्ता दुरुस्ती व मजबुती करणासाठी आ. किशोर पाटील यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल ना. चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. परिसरातील नागरिकांनीही याबाबत आनंद व्यक्त केला आहे.