शेती उद्योगात नाविन्यपूर्ण प्रयोगशीलता विकसीत करा- आ. शिरीष चौधरी

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । शेती उत्पादनात केलेले नवनवीन प्रयोग यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तसेच स्व. पंकज महाजन प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील आहे. यापुढेही राहू असे आ.शिरीष चौधरी यांनी केले. ‘स्व.पंकज महाजन कृषी साधना पुरस्कार’ वितरण करण्यात आले त्यावेळी आ. चौधरी बोलत होते. 

धनाजी नाना महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी १ ऑगस्ट रोजी पाचव्या पुरस्कार वितरण समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील फळबाग तज्ञ व गट शेती प्रवर्तक डॉ. भगवानराव कापसे, नागपूर येथील बांबू मिशनचे समन्वयक आर.डी. पाटील उपस्थित होते.

यावेळी आमदार शिरीष चौधरी यांनी स्वर्गीय पंकज महाजन यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन पर्यायी पिके घेत विकास साधून शेतकरी बांधवांना प्रोत्साहित केले म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

प्रमुख अतिथी डॉ. भगवानराव कापसे, आर.डी. पाटील यांनीही उपस्थित शेकतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र पालचे महेश महाजन यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मधुकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागवत पाटील, धनंजय चौधरी, रमेश पाटील रावेरचे माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, संजय महाजन, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, लीलाधर चौधरी, अजित पाटील, बापू पाटील, विलास तायडे, प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, प्राचार्य आर. एल. चौधरी, प्रभात चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, रमेश महाजन, पं.स. सदस्य सुरेखा पाटील, कृषी महामंडळ पुणे येथील कृषी दूत तेजस झोपे, निरंजन पाटील, निरंजन बोरसे, किरण सतारले, राज गुंडगुंळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन पंकज महाजन मित्रपरिवार व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या तर्फे करण्यात आले होते.

यांना मिळाला पुरस्कार

– आर.एस. पाटील मोरगाव ता. रावेर ( जलसंधारण पुरस्कार )

कार्य जलसंवर्धन नदी-नाले बंधारे खोलीकरण दुरुस्ती स्मशानभूमी सुशोभीकरण

 

– दीपक चौधरी सांगवी ता यावल ( कृषी प्रक्रिया पुरस्कार)

शेती सोबतच पीक प्रक्रिया उद्योग लाकडी घाण्यापासून भुईमूग, तीळ ,सोयाबीन, जवस, खोबरेल तेल निर्मिती

– रझोदकर शेतकरी उत्पादन कंपनी (गट शेती व मूल्यवर्धन पुरस्कार)

हळद प्रक्रिया, खपली गहू, हळद पावडर निर्मिती डाळ प्रक्रिया व मेट्रो सिटीमध्ये  विक्री

Protected Content