धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. १८ मार्च) दुपारी १२ वाजता ही घटना घडली. शेवटी, शनिवारी (दि. २२ मार्च) दुपारी ३ वाजता कुटुंबीयांनी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घराबाहेर शौचासाठी गेली असता ती परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु कुठेही काही माहिती मिळाली नाही. मुलीच्या बेपत्ता होण्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणी आणि ओळखीच्या लोकांकडे विचारणा केली. मात्र, तिच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. शेवटी, त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.