Home क्राईम कालिंका माता मंदीर परिसरात १३ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता; नागरीकांना आवाहन

कालिंका माता मंदीर परिसरात १३ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता; नागरीकांना आवाहन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कालिंका माता मंदीर परिसरात राहणारा एक १३ वर्षीय मुलगा सोमवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपासून बेपत्ता झाला आहे. दरम्यान या परिसरात कुणालाही दिसून आला असेल तर नजीकच्या एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे यांनी केले आहे.

पुणीत राजेंद्र भोळे वय १३ रा. कालिंका माता मंदीर परिसर, जळगाव असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सोमवारी दुपारी १ वाजेपासून या परिसरात बेपत्ता झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. परंतू अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतीही माहिती मिळून आली नाही. त्यामुळे त्याचे आई व नातेवाईक अत्यंत घाबरलेल्या असून एमआयडीसी परिसर किंवा इतर भागात कुणाला हा मुलगा मिळून आला तर नजीकच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात किंवा सामाजिक कार्यकर्ते सुरज नारखेडे (मो. नं. 6209191919 किंवा 8888991010) यावर संपर्क साधाव असे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound