रावेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयातील औषध वितरकाला कोरोनाची बाधा झाली असून तालुक्यात आज नवीन १३ रूग्णांची भर पडली आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात १३ नवीन बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात रावेर येथील ग्रामीण रूग्णालयातच्या औषध वितरकाचा समावेश आहे. यासोबत शहरातील क बँक कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आलेला आहे.
आज तालुक्यात १३ रूग्ण असून यात ऐनपुर येथील दोन जणांचा समावेश आहे. प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला असून संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रारंभ करण्यात आला आहे. या रूग्णांचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात आला असून या भागात फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.