Home Cities जामनेर जामनेर भाजप पूर्व मंडळाच्या रक्तदान शिबिरात १२५ बाटल्यांचे संकलन

जामनेर भाजप पूर्व मंडळाच्या रक्तदान शिबिरात १२५ बाटल्यांचे संकलन

0
176

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत जामनेर तालुक्यातील पूर्व मंडळात वाडी किल्ला व ढालगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “सेवा हीच संघटना” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात एकूण १२५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १२५ रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जामनेर शहराच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे. के. चव्हाण, सरचिटणीस अतिश झाल्टे, भाजप पूर्व तालुकाध्यक्ष मयूर पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनिता पाटील, तसेच विलास पाटील, रमेश नाईक, भाईदास चव्हाण, निलेश चव्हाण, के. बी. पाटील, प्रमोद सोनवणे, बाळू चव्हाण, किशोर नाईक, अशोक भोईटे आणि विकास पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात युवकांचा विशेष उत्साह दिसून आला. काहींनी प्रथमच रक्तदान करत सामाजिक जबाबदारी पार पाडली, तर काही नियमित रक्तदात्यांनी पुन्हा एकदा गरजूंना जीवनदान देण्याचा संकल्प घेतला. या शिबिराद्वारे भाजपने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपयोग करत, जनतेसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचा आदर्श उभा केला आहे.

शिबिराचे संपूर्ण नियोजन भूसंपर्क टप्प्यावर कार्यरत कार्यकर्त्यांनी केल्याने आयोजन सुरळीत पार पडले. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यास मदत झाली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, प्रत्येक सुजाण नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.


Protected Content

Play sound