Home क्राईम रेल्वे अपघातातील १२ जणांची ओळख पटली; शवविच्छेदन करून मृतदेह रवाना होण्याच्या तयारीत...

रेल्वे अपघातातील १२ जणांची ओळख पटली; शवविच्छेदन करून मृतदेह रवाना होण्याच्या तयारीत !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवेमुळे रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वेच्या बाहेर उड्या घेतल्या, आणि त्याच वेळी मागून येणारी कर्नाटक एक्सप्रेसने रूळावर उभे असलेल्यांना धडाधडक चिरडल्याची भयंकर घटना बुधवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर ११ जण किरकोळ जखमी झाले आहे. यापैकी १२ प्रवाशांची ओळखी पटली असून एका मृतदेहाची ओखट पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे देशभरात मोठी खबळबळ उडाली आहे.

अशी आहे घटना :
पुष्पक एक्सप्रेस ही मुंबईकडे जात असतांना काहींनी रेल्वेत आग लागल्याची बातमी पसरविण्यात आली. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेची इमरजन्सी चैन खेचून पुष्पक रेल्वे ही पाचोरा ते परधाडे थांबली. आग लागल्याच्या अफवेमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी उड्या घेतल्या. काही प्रवाशी हे रेल्वेलाईन नसलेल्या भागात उतरले तर काही प्रवाशी हे रेल्वेच्या दुसऱ्या बाजूच्या रेल्वे पटरीवर उतरले होते. त्याचवेळी मुंबईकडून जळगावकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेस आल्याने अनेकांची धावपळ झाली. तर दुदैवाने काही प्रवाशी रेल्वे खाली येवून ठार झाले. ही घटना बुधवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली.

आप्तांचा आक्रोश :
या भयंकर अपघातात सुरूवातीला २० ते ३० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. कारण त्यावेळी सर्व मृतदेहाचा चेंदामेंदा झाला, काहींचे शिर धडापासून वेगळे झाले, काहींचा हात, पाय वेगवेगळे छिन्नविछीन्न आवस्थेत पडलेले दिसून आले. यावेळी जे बचावले त्यांनी हे सर्व दृष्य पाहून प्रचंड धक्का बसला. तर काहींची शुध्दच हरपली होती. ही बातमी वाऱ्यासारखी संपुर्ण देशात पसरली. पाचोरा पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन यांच्यासह जळगाव येथून आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे दिसून आले.

ओळख पटविण्याच्या कामाला गती :
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह रेल्वे प्रशासन देखील घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी सर्वांचे मृतदेह उचलून रात्री ८ वाजेपर्यंत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ओळख पटविण्याच्या कामाला गती देण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी :
भीषण अपघाताची वार्ता धडकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली होती. यावेळी रूग्णवाहिका रूग्णालयात दाखल होताच मृतदेह शवविच्छेदन गृहात रवाना करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे नेते आणि पत्रकांराची मोठ्या संख्येने गर्दी होती. यावेळी मयतांच्या नातेवाईकांना धीर देण्याचे काम सुरू होते.त्यानंतर ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

अशी आहेत मयतांची नावे :
जवकला मरूटे जयगडी (वय ६०, रा कमलाबाजार नेपाळ ह.मु.भिवंडी ठाणे), कमला नवीन भंडारी (वय ४२ रा. विना टॉवर, कुलाबा, मुळे रा, नेपाळ), लच्छीराम खन्नू पासी (वय ४० रा. नेपाळ), नसरूद्दिन बद्रुद्दीन सिध्दीकी (वय १८ रा, गोंडा, उत्तर प्रदेश), बाबु खान मोहम्मद सफी खान (वय २७ रा. बहराईचा उत्तरप्रदेश), नंदराम पदमे विश्वकर्मा वय-४७, मैसारा नंदराम विश्वकर्मा वय ४२ हिमू नंदाराम विश्वकर्मा (वय-११) तिघे रा. नेपाळ ह.मु. पुणे, इंम्तियाज अली (वय-३५, रा. गुलरिहा, उत्तरप्रदेश), महेश राव गुरदीम वय-२७, रा. विलोरी, मुंबई, राधेश्याम अगनू राळ (वय-२८ रा.नेपाळ), शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण (वय-४०) अशी मयत झालेल्या १२ जणांची नावे आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांनी दिली भेट :
रेल्वे अपघात घडल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांनी ५ लाखांची घोषणा करण्यात आली. तर जखमींसाठी तात्काळ ५० हजारांची मदत करण्यात आली. गुरूवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी मयताच्या नातेवाईकांची विचारपूस करून धीर दिला. मयत आणि जखमी प्रवाशांचा आढावा घेवून प्रशासनाला आवश्यक त्या सुचना देण्यात आले.

मृतदेहांवर झाले शवविच्छेदन :
रेल्वेच्या भीषण आपघातात १३ जणांचा बळी गेला आहे. यापैकी ११ जणांची ओळख पटविण्यास प्रशासनाला यश आले. ओळख पटलेल्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर इच्छित स्थळी पोहचविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून पुर्णपणे सहकार्य लाभणार आहे. मृतांच्या नातेवाईक आणि जखमींच्या मदतीसाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संघाटनांनी धाव घेतली होती. यावेळी त्यांच्या राहण्यासह जेवन, चहा, नास्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.


Protected Content

Play sound