पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आगारात २८७ पैकी विविध कारणांमुळे रजेवर असलेले कर्मचारी सोडुन २७० कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहेत. दरम्यान, या उपोषणास प्रोत्साहित करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना आगार प्रमुख निलिमा बागुल यांनी निलंबित केले आहे.
तथापि, ही निलंबनाची नोटीस बस स्थानकाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ चालक, ५ वाहक व एका कार्यशाळेतील कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
महामंडळाचा दडपशाही करण्याचा प्रयत्न – पुजा गोसावी (वाहक)
पाचोरा आगारात गेल्या ७ दिवसांपासून सनदशील व शांततेत आंदोलन सुरू असुन आगार प्रमुखांनी कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता थेट नोटिस बोर्डावर १२ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची नोटीस लावली आहे. निलंबन करा अथवा जेल मध्ये ही टाकले त्याची पर्वा न करता आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत राहु. असे निलंबित महिला वाहक पुजा गोसावी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठी मागे ठामपणे उभे राहु – कपिल पाटील
एस. टी. महामंडळाने १२ कर्मचाऱ्यांचे निलंबन हे सुळबुद्दीने केलेले असुन आम्ही आगारातील सर्व कर्मचारी हे आमचेही निलंबन झाल्याचे समजुन १२ कर्मचाऱ्यांच्या पाठी मागे खंबीरपणे उभे आहोत. जो पर्यंत शासन सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत विलिनीकरण करुन घेत नाही. तो पर्यंत कितीही संकटे आली तरी आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे कर्मचारी कपिल पाटील यांनी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/922307338707434