मुंबई- राज्यात आज कोरोनाचे ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले तर ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज कोरोनाचे ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले तर ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले ११,८५२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले १८४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :मुंबई मनपा-११७९ (३२), ठाणे- २२१ (१०), ठाणे मनपा-२०७ (९), नवी मुंबई मनपा-३०४ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५९ (१), उल्हासनगर मनपा-५५ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-१३२, पालघर-८२ (२), वसई-विरार मनपा-१५९ (१), रायगड-२७२, पनवेल मनपा-१९१ (१), नाशिक-२०२ (१), नाशिक मनपा-६५१ (२), मालेगाव मनपा-४२, अहमदनगर-१८० (२),अहमदनगर मनपा-५७ (१), धुळे-११३ (२), धुळे मनपा-६८ (१), जळगाव- ४६२ (१०), जळगाव मनपा-१४४ (१), नंदूरबार-१०५, पुणे- ४६४ (२), पुणे मनपा-८७५ (७), पिंपरी चिंचवड मनपा-५९२, सोलापूर-२२२ (३), सोलापूर मनपा-४४ (१),
सातारा-४२२(७), कोल्हापूर-३२० (१५), कोल्हापूर मनपा-१९६ (४), सांगली-४४६ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-३०१ (१), सिंधुदूर्ग-१३६, रत्नागिरी-८२ (१), औरंगाबाद-१९३ (२),औरंगाबाद मनपा-१८८ (२), जालना-९३ (२), हिंगोली-५९, परभणी-३९, परभणी मनपा-३९, लातूर-१२१ (३), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१३२ (६),बीड-९४ (३), नांदेड-१२५ (४), नांदेड मनपा-१४९ (४), अकोला-३, अकोला मनपा-७, अमरावती-३२, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-३७ (३), बुलढाणा-६६ (१), वाशिम-४ (१) , नागपूर-१५६ (३), नागपूर मनपा-६४५ (१२), वर्धा-५, भंडारा-२३, गोंदिया-२९ (१), चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-१११ (१), गडचिरोली-६, इतर राज्य १२.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.