जळगाव प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शांतता राहावी याकरिता जळगाव उपविभागीय अधिकारी यांनी 11 जणांना 21 ते 23 एप्रिल 2019 या तीन दिवस जिल्हाबंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. हद्दपार गुन्ह्यातील आरोपीना तीन तास मतदानासाठी मुभा देण्यात आली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांकडून मिळाली आहे.
11 जण हद्दपार याप्रमाणे
अमोल उर्फ गंप्या राजेंद्र सोनार, सनी उर्फ फौजि बाळकृष्ण जाधव, पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे, मोहसिन बेग हसन बेग, मुकेश रोहिदास झालटे, प्रदीप सांडू सपकाळे, खुशाल उर्फ बाल्या काळू मराठे, सोनूसिंग रमेश राठोड, आकाश अरुण दहेकर, मोहसिन्ं खान उर्फ दता, मोनुसींग जगदीशसिंह बवरी यांचा समावेश आहे.