जळगाव प्रतिनिधी । बसने अमळनेरहून जळगावला आलेल्या महिलेच्या पर्समधून १० हजार रूपये लांबविल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पल्लवी सुनिल चौधरी (वय-२४) रा. मायादेवी नगर महाबळ जळगाव ह्या खासगी कामासाठी १७ एप्रिल रोजी अमळनेर येथे गेल्या होत्या. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अमळनेर-जळगाव बसमधून प्रवास करत जळगावला दुपारीह २ वाजता आल्या. बसमधुन त्या आकाशवाणी चौकात उतरल्या होत्या. अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समधून १० हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे लक्षात आले. प्रवासादरम्यान त्यांना एका महिलेने धक्का देवून त्याच्या पाठीला लावलेल्या बॅगेतून रोकड काढल्याची लक्षात आली. त्यांनी तातडीन जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. पल्लवी चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.