Home क्राईम पुलवामा येथील खासगी शाळेत स्फोट;10 विद्यार्थी जखमी

पुलवामा येथील खासगी शाळेत स्फोट;10 विद्यार्थी जखमी


श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका खासगी शाळेत झालेल्या स्फोटात 10विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.


स्फोटाची खबर मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसे संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली. स्फोट झाला तेव्हा शाळेमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लास सुरू होते. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेले विद्यार्थी दहावीतील होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान,जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound