मधमाश्यांच्या हल्ल्यात १० जण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयाच्या आवारात मधमाशांच्या हल्ल्यात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव ते शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी ६ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक मधमाशांनी हल्ला केला. या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलेले जळगाव जिल्ह्यातील पाच शिक्षक आणि एक विद्यार्थिनी हे जखमी झाले आहे. यात यशश्री राजेंद्र गांगुर्डे वय-१९, रा. रायसोनी कॉलेज, किशोर गुलाबराव पाटील वय-५०, मसूद अहमद शेख मन्सूर वय-३८, असीम खान मंजूर खान वय-४०, सय्यद अखलाक मुस्ताक भिस्ती वय-५४, आणि शेख जाफर वय-४५, शिध्देश्वर हेमराज तायडे वय २३, इकबाल खान रमजान खान वय ५१, युवराज विश्वनाथ सोनार वय ५७ हे गंभीर जखमी झाले आहे. जखमी झालेल्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content