एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल येथील नवीन वसाहतीत रस्त्यांची खुप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.याठिकाणी कच्चे रस्ते असल्याने रहिवाशांना पावसाळ्यात फार मोठी कसरत करावी लागते. याबद्दल रहिवाशांनी वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या वृत्तपत्राच्या किंवा सोशल मीडिया च्या माध्यमातून पोहोचवल्या होत्या. याबद्दल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.याबाबत युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील यांनी लवकरच सदर कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
दरम्यान सध्या शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नविन पाईप लाईन चे खोदकाम सुरू आहे.त्यामुळे सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे यामुळे रहिवाशांना मोठी कसरत करावी लागते.यासाठी नवीन वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांनी नेहमी आपल्या समस्या शासन दरबारी वृत्तपत्राच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवल्या आहे.यासाठी शहरातील गांधी पुरा रामदास कॉलनी, श्रीराम कॉलनी, विद्युत कॉलनी, शंकर नगर, प्रभा नगर, गणपती नगर, हिंगलाज कॉलनी, हनुमान नगर, आदर्श नगर, ओम नगर, लक्ष्मी नगर, आनंद नगर, साई नगर, इंद्रप्रस्थ नगर, अष्टविनायक कॉलनी यांनी युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांच्या कडे रस्त्यांची व मुलभूत सुविधांची रहिवाशांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या तसेच याप्रसंगी रहिवाशांनी त्यांना निवेदन देखील दिले होते. यानंतर प्रा.पाटील यांनी सदर रहिवाशांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
या अनुषंगाने त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यां समवेत प्रा.पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन सदर समस्या ची माहिती दिली व शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.आमदार चिमणराव पाटील यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.आमदार पाटील यांनी शासनाकडे नविन वसाहती मधील शासनाच्या हद्दवाढ व वैशिष्टपूर्ण योजनेतून सुमारे दहा कोटींचा रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे प्रा.मनोज पाटील यांनी सांगितले.तसेच सदर निधी मंजुर केल्याबद्दल शासनाचे व आमदार पाटील यांचे प्रा.पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे.तसेच रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.